Thursday, October 18, 2012

माझा एक संदेश माझ्या आदिवासी बांधवाना ...


माझा लेख प्रसिद्ध करून मला आदिवासी लोकांपार्येंत माझे विचार पोहचवण्यासाठी एक सुवर्णसंधी दिली त्याबद्दल प्रथम मी माझे सहकारी श्री गणपत जानू वारगडा (पत्रकार) याचे मनापासून आभार मानतो. आपण आपल्या समाजासाठी करत असलेले कार्य अतुलनीय आहे. याअर्थी तुम्ही विशेषअंक काढून माझे विचार आपल्या आदिवासी समाजापर्येंत पोहचवण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. आदिवासी सामाजिक जागरुकता करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग आदिवासी विकासासाठी करून घेणे व आदिवासी विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्था यांना एकाच मंचावर आणणे आहे. सामाजिक विकास हा कुणी एका संस्थेने, खात्याने किवा योजनेने होणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी सोबत येऊन मेहनत घेणे गरजेचे आहे. तेवढेच ध्येय, दृष्टीकोन (विजन आणि मिशन) महत्वाचे आहे.आदिवासी विकासाचा विचार करता तेच प्रकर्षाने जाणवते, खूप साऱ्या संस्था, संघटना, समाजसेवक, शासकीय कर्मचारी आप-आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण जोपर्यंत आदिवासी युवकांमध्ये आणि समाजामध्ये विकासाबद्दल जाणीव होत नाही तोपर्यंत एकतर्फी विकास फक्त कागदावरच राहील. म्हणून आदिवासी तरुणांमध्ये आणि समाजामध्ये जागरुकता करण्यासाठी आणि सगळ्या आदिवासी संस्था, संघटना, समाजसेवक यांना एका व्यासपीठावर आदिवासी समाजाच्या भविष्याचा विचार करण्याकरिता मी हा संदेश देत आहे. आदिवासी समाज एक कुटुंब ही भावना तयार करून समाजात एकता आणणे महत्वाचे आहे. आणि हे सगळे कुणा एकाने शक्य नाही म्हणून सगळ्यांनी सोबत येऊन आपली आपल्या आदिवासी कुटुंबासाठी प्राथमिक जबाबदारी पार पडायची आहे . या भावनेने सामाजिक कार्यात सहभागी होणे अपेक्षित आहे त्यामुळे मी प्रथम तरुण वर्गाला पुढे येण्यास मन:पूर्वक संदेश पाठवत आहे .आदिवासी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे त्यासाठी मार्गदर्शन व प्रचार करणे .धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार यासारख्या गोष्टीचे महत्व आणि जाणीव टिकवून ठेवणे कर्म हीच पूजा असेल तर आपण आपले कौशल्य, वेळ, इ. आपला विखुरलेला आदिवासी समाज एक करण्याकरिता उपयोगात आणू या. आपल्या आदिवासी संस्कृतीला प्राधान्य देवून आपले उत्सव व परंपरा जपण्या साठी सुद्धा तितकीच मेहनत घेऊया.आदिवासी पर्यटक ठिकाणाची काळजी घेणे तसेच त्या इतिहासिक ठिकाणाचा विकास करणे आदिवासी जमिनीवर होणारी बेकायदा अतिक्रमणे,अनेक शासकीय नियमाचे उल्घन करून मिळणाऱ्या परवानग्या थांबवणे. योजनाची माहिती देणे व राबवून घेणे .आदिवासी जमातींमधील कुपोषण, दारिद्रय आणि एकंदर रोगराई या सगळ्याचे मूळ अज्ञानात आहे ते दूर करणे. ध्येयप्रेरित समाजसेवकांनी तसेच आपल्या तरुण युवक वर्गानी आदिवासी भागात ज्ञानगंगा पोहचवण्याचे अथक व अफाट प्रयत्न करावे . दुर्गम पाडय़ा-वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेल्या आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणणे, आदिवासींच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करावे.आदिवासी शिक्षण, आरोग्य, भूमी, हक्क, रस्ते, विज, पाणी, सिंचन, स्वस्त दरात धान्य पुरवठा, घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा, शबरी आदिवासी योजना यासारख्या अनेक शासकीय योजना नुसत्या कागदावर न राहता त्याचा फायदा गरजू आदिवासी लोकांना करून देणे. आजच्या स्पर्धेच्या युगात आदिवासी समाज जर टिकवून ठेवायचा असेल तर आणि त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर प्रथम आपला सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला पाहिजे.आपणही आपल्या समाजासाठी काही तरी करावे या दृष्टीने जर सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला तर खरंच आपल्या भावी पिडीचे भविष्य उज्वल होणार आहे . सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती आपलेसेपणाची भावना जपून आदिवासी लोकांना संगठीत करून जनजागृती करणे अपेक्षित आहे.


No comments:

Post a Comment